आर्मीतील महिला अधिकार्‍यांना पेन्शन देण्याचा आदेश

March 12, 2010 3:46 PM0 commentsViews: 1

12 मार्च आर्मी आणि एअरफोर्समधील महिला अधिकार्‍यांना पेन्शन देण्याचा आदेश दिल्ली हायकोर्टाने दिला आहे. आतापर्यंत सैन्यातील महिला अधिकार्‍यांना फक्त 14 वर्षे सेवा देण्याचा नियम होता. त्यामुळे त्यांना पेन्शन आणि इतर अधिकार्‍यांना मिळणार्‍या सोयी मिळत नव्हत्या. पण दिल्ली हायकोर्टाने महिला अधिकार्‍यांनाही आर्मी आणि एअरफोर्समध्ये कायमस्वरुपी कमिशन देण्याचा आदेश दिला आहे. त्याचप्रमाणे महिला अधिकार्‍यांना सर्व सोयी आणि पेन्शन देण्यात यावी असेही हायकोर्टाने म्हटले आहे. यासाठी आर्मीतील 20 माजी महिला अधिकार्‍यांनी दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली होती. 4 वर्षांच्या सुनावणीनंतर हायकोर्टाने हे आदेश दिले आहेत.

close