लाहोरमधील स्फोटात 39 ठार

March 12, 2010 3:58 PM0 commentsViews:

12 मार्चलाहोरच्या कॅन्टोन्मेट भागात झालेल्या दोन बॉम्बस्फोटांमध्ये 39 जणांचा मृत्यू झाला आहे. या स्फोटात अनेकजण जखमी झाले आहेत. लाहोरमधील गर्दीचे ठिकाण असलेल्या आरए बाजार परिसरात हा बॉम्बस्फोट झाला. स्फोटापूर्वी त्या ठिकाणी गोळीबार झाल्याचे प्रत्यक्षदशीर्नी पोलिसांना सांगितले. लाहोरमधील हा भाग नेहमीच अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर राहिला आहे. काही दिवसांपूर्वी एका आत्मघातकी स्फोटाच्या सहाय्याने सरकारी कार्यालये उडवून देण्याचा प्रयत्न झाला होता.

close