आयपीएलची धूम सुरू

March 12, 2010 5:49 PM0 commentsViews: 2

12 मार्चआजपासून सुरू झालेल्या आयपीएलचा रंगारंग उद्घाटन सोहळा नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर रंगला. यावेळी बॉलीवूड स्टार्सच्या अदाकारीला आंतरराष्ट्रीय कलाकारांनी तडका दिला. आयपीएल कोणीही जिंको पण, यानिमित्तानं लोकांचे बहारदार मनोरंजन होणार आहे. आता पुढचे 45 दिवस क्रिकेटप्रेमींना झटपट क्रिकेटची मेजवानी मिळणार आहे… धडाकेबाज बॅटींग टी-ट्वेटी मॅचचे प्रमुख आकर्षण म्हणजे….बॅटींग.. सिक्स आणि फोरची बरसात… कमीत कमी बॉलमध्ये भरपूर रन्स करण्याची स्पर्धा… झटपट क्रिकेटच्या या मैदानात अनेक मोठे बॅटस्‌मन उतरतील. सेहवागपासून युवराज सिंग आणि अन्ड्रॅयू सायमन्डस पासून मॅथ्यू हेडनपर्यंत… अनेक धडाकेबजा बॅट्समनची बॅटींग यानिमित्तानं बघायला मिळणार आहे.प्रत्येक टिममध्ये असे दिग्गज बॅटसमन आहेत. पण, बॉलर्सला यामुळं बरीच कसरत करावी लागणार आहे.युवा बॉलर्सवर जबाबदारीपण बर्‍याच टीममध्ये बॅटस्‌मनला प्रत्युत्तर देण्सासाठी चांगल्या दर्जाचे बॉलर्सही आहेत. फास्ट बॉलर्सची तर कसोटी असतेच पण स्पीनर्सची भूमिकाही महत्वाची ठरते. गेल्या दोनही हंगामात युवा बॉलर्सनंही आपली छाप उमटवली आहे. आणि या हंगामातही त्यांच्यावरच मोठी जबाबदारी आहे…फिल्डींगकडे लक्षफिल्डींगकडे सर्वच टीम विशेष लक्ष देताहेत. टी-20 मध्ये वाचवलेला प्रत्येक रन विजय आणि पराजयात महत्वाचा ठरतो. त्यामुळं प्रत्येक संघातल्या ऑलराऊंडवर मोठी जवाबदारी असणार आहे. सर्वच संघात असे ऑलराऊंडर नाहीत. कोण जिंकणार आयपीएल?IPLमध्ये बॅट्समनची कामगिरी महत्वाची ठरणार असली तरी जी टीम बॉलिंग आणि फिल्डिंगमध्येही सरस कामगिरी करेल तीच टीम असेल आयपीएल सीझन 3ची विजेती…

close