नाशिकमध्ये पाणीकपाताची आवश्यकताच नाही, दशरत पाटलांचा काँग्रेसला घरचा अहेर

March 2, 2016 8:03 AM0 commentsViews:

नाशिक – 02 मार्च : धरणांचा जिल्हा अशी नाशिकची ओळख आहे. मात्र गेल्या वर्षी अपुरा पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यात पाणी टंचाई जाणवायला लागलीये. त्यातच प्रशासनानं शहराच्या पाणीपुरवठ्यात कपात केल्यानं पाणी चांगलंच तापलंय. पण, पाणीकपातीची आवश्यकताच नाही असं म्हणत दशरथ पाटील यांनी काँग्रेसला घरचा अहेर दिला.

nsk_dashrat_$मराठवाड्याला सोडण्यात आलेल्या 10 टीएमसी पाण्यानंतर सगळ्याच राजकीय पक्षांनी एकत्रित येऊन भाजपला चांगलंच कोंडीत पकडलं. काँग्रेसनंही पाणीकपातीची मागणी करुन भाजपावर चांगलंच तोंडसुख घेतलं. पण आता काँग्रेसच्याच दशरथ पाटील यांनी पाणीकपातीची आवश्यकताच नाही असं म्हणत काँग्रेसला घरचा अहेर दिला आहे.

शहराला पाणीपुरवठा हा गंगापूर धरणातून केला जातो. 2011 साली 1198 दश लक्ष घन फूट अर्थात 21.27 टक्के साठा असताना विना पाणीकपात नियमित पाणीपुरवठा झाला होता. मग आता धरणात 1943 दश लक्ष घन फूट अर्थात 34.51 टक्के साठा असताना पाणीकपात करुन नागरीकांना का वेठीस धरता असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय.

येत्या काही महिन्यात होणारी पालिकेची निवडणूक डोळ्यापुढे ठेऊन फक्त राजकारण केलं जातंय असा आरोप पाटील यांनी केलाय. दशरथ पाटील हे नाशिक पालिकेचे तब्बल 10 वर्ष महापौर होते. पत्रकार परीषदेत पाटील यांनी मुकणे,दारणा आणि गंगापूर धरणातून विसर्ग केल्या जाणार्‍या रेकॉर्डची थेट 10 वर्षांची आकडेवारी सादर केली होती.

काँग्रेससह मनसे, सेना आणि राष्ट्रवादी हे 11 कोटींचा निधी मिळवण्यासाठी राजकारण करीत असल्याचा आरोप त्यांनी केलाय आणि थेट राज ठाकरे यांना आव्हान दिलंय. विशेष म्हणजे सध्या काँग्रेसवासी असलेले पाटील हे मुळ शिवसैनिक असून अत्यंत कार्यक्षम महापौर म्हणून त्यांची कारकीर्दे गाजली होती.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close