‘ठाणे महिला पोलिसाला मारहाण प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा’

March 2, 2016 9:10 AM0 commentsViews:

thane_shivsenekठाणे – 02 मार्च : गाडी अडवली म्हणून वाहनचालकाने एका वाहतूक शाखेच्या महिला पोलिसाला मारहाण केली होती. या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालावा आणि महिलेसाठी विशेष सरकारी वकील नेमला जावा, यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत, असं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी म्हटलंय. रहाटकर यांनी या महिलेची ठाण्यात भेट घेतली. त्यांनी ठाणे वाहतूक शाखेच्या कार्यालयालाही भेट दिली.

ठाण्यातील नितीन कंपनी परिसरात कर्तव्यावर असणार्या महिला पोलिस शिपायाबरोबर गैरवर्तन करणार्‍या या वाहनचालकावर कारवाई व्हावी तसंच भविष्यात असे प्रकार होऊ नयेत या करिता ठाणे वाहतूक शाखेच्या कार्यालयात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी भेट दिली. महिला पोलिसाला मारहाण करणार्‍या शशिकांत कालगुडे यांच्यासारखे प्रकार भविष्यात कोणी करू नये या करिता फास्ट ट्रक कोर्टात सदरचा खटला चालवा तसंच या प्रकरणात एक विशेष सरकारी वकील नेमण्याकरिता प्रयत्न करणार असल्याचं राज्य महिला आयोगाचा अध्यक्षा विजया रहाटकर यांनी आज ठाण्यात सांगितलं. तसंच ठाण्यात मारहाण झाल्यानंतर अर्नाळा येथील महिलांच्या मारहाणीच्या घटनेनंतर भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नयेत या करिता प्रयत्न करणार असल्याचं देखील रहाटकर यांनी सांगितलं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close