कपिलच्या शोचं नाव ‘द कपिल शर्मा शो’, प्रोमोही रिलीज

March 2, 2016 2:21 PM0 commentsViews:

02 मार्च : कॉमेडीचा बादशाह कपिल शर्माने ‘कॉमेडी नाइट्स विथ कपिल’मधून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. आता कपिल लवकरच छोट्या पडद्यावर आपलं पुनरागमन करतोय त्याचा नवीन शो घेऊन. कपिलच्या या नवीन शोचं नाव असेल,’द कपिल शर्मा शो’. हा शो 23 एप्रिलपासून सोनी या वाहिनीवर सुरू होणार आहे.the kapil sharma show

कपिलच्या नव्या शोमध्ये त्याची ‘कॉमेड नाइट्सची’ पूर्ण टीम असेल फक्त ‘बुआ’ला वगळण्यात आलंय. ‘कॉमेडी नाइट्स’मधील बहुचर्चीत चेहरे गुत्थी(सुनील ग्रोवर),पलक(किकू शारदा),दादी(अली असगर),मंजु शर्मा(सुमोना चक्रवर्ती),राजू(चंदन प्रभाकर) ही सर्व कलाकार मंडळी ह्या शोमध्ये दिसतील. एवढंच नाही तर स्वत:च्या जबरदस्त शायरीने प्रेक्षकांना टाळ्या वाजवायला भाग पाडणारे ‘नवजोत सिंग सिद्धू’या शोमध्ये असणार आहे. प्रेक्षकवर्ग आता कपिलच्या नवीन ‘द कपिल शर्मा शो’ला किती पसंती देतात हे 23 एप्रिल नंतरच कळेल.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close