डेंटल कॉलेजचे इंटर्न संपावर

March 12, 2010 6:01 PM0 commentsViews: 6

12 मार्च मुंबईतील गव्हर्नमेंट डेंटल कॉलेजचे 80 इंटर्न गेले 5 दिवस संपावर आहेत.कॉलेजमध्ये एक्सटर्न म्हणजेच खाजगी किंवा अन्य विद्यापीठांतून आलेल्या विद्यार्थ्यांविरोधात त्यांनी संप पुकारला आहे. कॉलेजमध्ये 46 एक्सटर्न काम करतात. त्यापैकी 28 एक्सटर्न जादा भरण्यात आल्याचा त्यांचा आरोप आहे. परंतू प्रत्यक्षात हे 28 एक्सटर्न सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुनच भरण्यात आले होते, अशी माहिती कॉलेजचे डीन डॉ. मानसिंग पवार यांनी दिलीय. तरीही इंटर्नच्या दबावाखाली राज्य सरकार आणि कॉलेजच्या डीननी 28 एक्सटर्नना मूळ कॉलेजला परत पाठवण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.इंटर्न आणि राज्य सरकारच्या या भांडणात कायदेशीर प्रक्रियेने भरती झालेल्या विद्यार्थ्यांचेच नुकसान होत आहे. शिवाय एकूण 46 एक्सटर्नपैकी फक्त 12 लोकांनाच आतापर्यंत मूळ कॉलेजला परत पाठवण्याचे पत्र देण्यात आले आहे. त्यामुळे उर्वरित सर्वच विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे.धक्कादायक बाब म्हणजे शिक्षणमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेरच्या कॉलेजने त्यांच्या 12 विद्यार्थ्यांना परत बोलावले आहे. त्यासाठी कारण दिले आहे, पेशंटस् वाढल्याचे. पण संगमनेर कॉलेजचे विद्यार्थी नायर, डी. वाय. पाटील, तेरणा, येरळा, रंगूनवाला, भारती विद्यापीठ या डेंटल कॉलेजमध्येही आहेत. त्यांना का परत बोलावण्यात आले, नाही असा त्यांचा प्रश्न आहे.

close