माओवाद्यांच्या गडात पोलीस स्टेशन

March 2, 2016 2:56 PM0 commentsViews:

02 मार्च : छत्तीसगड महाराष्ट्र सीमेवरील माओवाद्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी थेट जंगलातच ठाण मांडलंय. गडचिरोलीपासून थेट 290 किलोमीटर अंतरावर असलेल्या पातागुडम या भीषण जंगलात पोलिसांनी एका दिवसात पोलीस स्टेशन उभारलं आहे. जवळपास 500 जवानांनी हे पोलीस स्टेशन उभारलंय. या जंगलात साधा रस्ता नाही, वीज नाही, त्यामुळे दूरध्वनीची सोय नाही तरीही या जवानांनी माओवाद्यांशी दोन हात करण्यासाठी निर्धार केलाय. छत्तीगड सीमेपासून अवघ्या शंभर मीटर अंतरावर हे पोलीस स्टेशन तयार करण्यात आलं आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close