संसदेत ओबीसी आरक्षणाची भुजबळ यांची मागणी

March 13, 2010 9:19 AM0 commentsViews: 2

13 मार्चओबीसींना संसदेत आरक्षण मिळावे, अशी मागणी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. कार्ला इथे सुरू झालेल्या राष्ट्रवादीच्या दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनात त्यांनी ही मागणी केली आहे. ओबीसींना संख्येनुसार आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली. यापूर्वी भुजबळांनी राजस्थान आणि बिहार या ठिकाणी भारतातील ओबीसी वर्गाला एकत्र आणून भव्य मेळावा भरवला होता. आता पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या अधिवेशनाच्या निमित्ताने त्यांनी ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पुन्हा उचलण्याचा प्रयत्न केला आहे.या अधिवेशनात राष्ट्रवादीचे देशभरातील पदाधिकारी सहभागी झाले आहेत. या पदाधिकार्‍यांसाठी लोणावळ्यातील 7 थ्री स्टार हॉटेल्स बुक झाली आहेत. लोणावळा आणि कार्ला परिसरात सर्वत्र फ्लेक्स आणि राष्ट्रवादीचे झेंडे लावले गेले आहेत. त्यामुळे येथील वातावरण राष्ट्रवादीमय झाले आहे. या अधिवेशनासाठी एकूण 250 वरिष्ठ नेत्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. अधिवेशनाच्या सुरक्षेसाठी खाजगी सुरक्षा रक्षकही मोठ्या प्रमाणावर तैनात करण्यात आले आहेत.

close