‘रिक्षा हवाय, मराठी बोला’

March 2, 2016 3:14 PM0 commentsViews:

पुणे – 02 मार्च : तुम्हाला जर रिक्षाचालवण्यासाठी परवाना हवा असेल तर मराठी आलंच पाहिजे तसा अध्यादेश परिवदन खात्यानं काढला होता. त्याचाच एक भाग म्हणून राज्यभरात नवीन रिक्षाचालकांची मराठी वाचन आणि बोलण्याची परीक्षा घेण्यात आली. या पुढे रिक्षा चालवण्याचा परवाना मिळवायचा असल्यास संबंधित उमेदवाराला मराठी वाचता आणि बोलता येणे बंधनकारक असणार आहे. पिंपरी चिंचवड़मध्ये ज्या मुलाखती झाल्या त्यात सर्वच्या सर्व उमेदवार पास झाले आहे. काहींनी मात्र याला आक्षेप नोंदवलाय. तर काही रिक्षाचालकांनी या उपक्रमाच स्वागतही केलंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close