आजचा दिवस मुंबईकरांसाठी खास

March 13, 2010 9:33 AM0 commentsViews: 3

13 मार्चआज आयपीएलच्या दुसर्‍या दिवशी मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स समोरासमोर असतील. सचिन तेंडुलकर आणि शेन वॉर्न तसेच पोलार्ड विरुद्ध युसुफ पठाण यांच्यातील मुकाबला म्हणून या मॅचकडे पाहिले जात आहे. मुंबई इंडियन्सची पहिली मॅच आहे ती राजस्थान रॉयल्स टीमविरुद्ध ब्रेबॉर्न स्टेडिअमवर आणि यासाठीच टीमच्या मालक नीता अंबानी यांनी 'दुनिया मुठ्ठीमे'ं करण्याचा आपला सुपर हिट फॉर्म्युला सचिन आणि टीमला दिला आहे.सचिन तेंडुलकर सध्या टेस्ट आणि वन डेमध्येही जबरदस्त फॉर्मात आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वन डे डबल सेंच्युरीमुळे तर सध्या त्याच्याच नावाची चर्चा आहे. आणि सचिनला सीनिअर बॅट्समन सनथ जयसूर्याची साथ मिळाली तर समोरच्या टीमच्या बॉलर्सच्या नाकीनऊ येणार हे नक्की. शिवाय गेल्यावर्षी चॅम्पियन्स लीग गाजवणारा बॅट्समन कायरन पोलार्ड यावर्षी मुंबईच्या टीममध्ये असणार आहे. आणि तिसर्‍या हंगामातला तो सगळ्यात धोकादायक बॅट्समन असेल हे नक्की. बॉलिंगमध्ये टीमला आशा असेल ती स्पीनर हरभजनकडून. श्रीलंकेचा दिलहारा फर्नांडो आणि आफ्रिकन जीन पॉल ड्युमिनी कशी कामगिरी करतात यावरही टीमचे यश अवलंबून असेल. पहिल्या दोन्ही हंगामात मुंबई इंडियन्स टीमला सेमी फायनलच्या जवळही पोहोचता आले नव्हते. पहिल्या हंगामात त्यांनी सात मॅच जिंकल्या. तर सात गमावल्या. महत्त्वाच्या खेळाडूंना मोक्याच्या क्षणी चांगली कामगिरी करता आली नाही. 2009 हंगामात तर टीमची कामगिरी अजूनच खालावली आणि त्यांना चौदापैकी फक्त पाच मॅच जिंकता आल्या. यावेळी मात्र टीमचे प्रमुख खेळाडू चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. आणि त्यांनी सातत्यपूर्ण कामगिरी केली तर टीमला सेमी फायनलच्या आशा नक्कीच धरता येतील.

close