‘तुमच्या पतींना पान मसालाची जाहिरात करण्यास मनाई करा’

March 2, 2016 4:39 PM0 commentsViews:

shah-rukh-khan-gauri-khan-kajol-malaika-arora-khan
02 मार्च : पान मसाल्याच्या जाहिरात करणार्‍या अभिनेत्यांकडून कोणतेही उत्तर न आल्याने दिल्ली सरकारने आता त्यांच्या होममिनिस्ट यांनाच गाठलंय. चार बॉलिवूड अभिनेत्यांच्या पत्नींना विनंती केली की, त्यांनी आपल्या पतींना पान मसाल्याची जाहिरात करण्यास मनाई करावी.

ज्या जाहिरातीत सुपारी आहे. कारण सुपारी ही तब्येतील घातक असून त्यामुळे कॅन्सर होतो. दिल्ली सरकारचे स्वास्थ्य निर्देशक, डॉ.एस. के.अरोरा यांनी अभिनेता अजय देवगनची पत्नी काजोल,शाहरूखची पत्नी गौरी, अरबाजची पत्नी मलायका आणि गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा यांना पत्र लिहून म्हटलंय की, त्यांनी जनहिताचा विचार करून आपल्या पतींना पान मसाला सारख्या उत्पादनांची जाहिरात करण्याची मनाई करावी.

गौरीला लिहिलेल्या पत्रात अरोरांनी म्हटलंय की,याआधी देखील त्यांनी शाहरूखला पान मसाल्याची जाहिरात बंद करण्याचे पत्र लिहिलेले,पण शाहरूखचं उत्तर आलं नाही आणि शाहरूखने पान मसाल्याच्या जाहिराती बंदही केल्या नाहीत.अरोरांच्या म्हणण्यानुसार, या पान मसाल्यांमध्ये तंबाखू आणि निकोटीन जराही नसले, तरी यामध्ये सुपारी असते आणि ती कॅन्सरकारक असते.

अरोरांनी या आधी असंच एक पत्र सनी लिओनीलाही लिहिलं होतं. पण तिच्याकडून अरोरांना सकारात्मक उत्तर मिळालं आणि ती यापुढे अशा कोणत्याही जाहिराती करणार नाही असं आश्वासनंही दिलं. तसंच अशा तंबाखू विरोधक अभियानात सहभागी होण्याचंही सनी लिओनीने म्हटलंय. दिल्ली सरकारने अभिनेते आणि त्यांच्या पत्नींना दरवर्षी होणार्‍या तंबाखू विरोधक अभियानात सहभागी होण्याचं आवाहन केलंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close