रेल्वेमध्ये नोकरीचं आमिष दाखवणार्‍या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश, चौघांना अटक

March 2, 2016 5:59 PM0 commentsViews:

सूरज ओझा, मुंबई

02 मार्च : मुंबई जीआरपीनं चार लोकांना अटक केलंय. या चौघांनी रेल्वे भरती नियंत्रण बोर्डाची खोटी वेबसाइट बनवली होती. या वेबसाईटच्या आधारे लोकांना रेल्वेमध्ये नोकरीचं आमिष दाखवून लोकांची फसवणूक सुरू होती. हा धक्कादायक प्रकार या चौघांच्या अटकेमुळे समोर आला आहे.

sdasdadopy

अहमद खान, महम्मद मेहमूद आलम, नरेश पाटील, आणि सौरभ भगत, अशी या चौघांची नावं आहेत. बेरोजगार तरुणांना गाठणं आणि त्यांना रेल्वेमध्ये नोकरीचं आमिष दाखवून लुटणं, हा या चौघांचा धंदा होता. त्यासाठी या चौघांनी रेल्वे भरती नियंत्रण बोर्डाची एक खोटी वेबसाईटच बनवली. इच्छुक तरुणांना या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज भरायला लावून त्यांची परीक्षाही घेतली जायची, त्याचा वेबसाईटवर निकालही जाहीर व्हायचा, इतकंच नाही तर तरुणांना नोकरी लागल्यासाचं खोटं आयकार्डही दिलं जायचं.

हा प्रकार असाच बिनबोभाट सुरू होता पण 3 फेब्रुवारीला पश्चिम रेल्वेच्या चर्नी रोड स्टेशनवर याचा भंडाफोड झाला. टीसीला एक व्यक्ती विनातिकीट प्रवास करताना सापडली. त्या व्यक्तीनं स्वत: टीसी असल्याचं ओळखपत्र दाखवलं आणि त्यानंतर एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला.

हे आरोपी तरुणांना दोन पदावर नोकरी देण्याचं आमिष दाखवायचे आणि त्यासाठी रक्कमही मोठी वसूल करायचे.

रेल्वे भरतीचं मोठं रॅकेट, बनावट वेबसाईटवरून लूट

गँगमनसाठी 4 लाख रु.
टीसीसाठी 6 लाख रु.
वेबसाईट irrbresultsgov.in

पोलिसांनी या आरोपींच्या घरी छापे टाकले तेव्हा यांच्या घरातून पोलिसांना एक कॉम्प्युटर, बनावट अर्ज, बनावट अपॉइंटमेंट कार्ड, आयकार्डचे नमुने मिळाले. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत 4 जणांना अटक केली आहे. तसंच या घोटाळ्याची व्याप्ती देशभरात असल्याचा संशयही पोलिसांनी व्यक्त केला आहे.

खोट्या वेबसाईट कशी ओळखाल

- www.whoisit.net या वेबसाईटवरुन योग्य वेबसाईटची खात्री करुन घ्या
– ऑनलाईन फ्रॉडपासून सावधान
वेबसाईटवर माहिती पुरवताना काय काळजी घ्यावी
– thanepolice.org,cybercellmumbai.gov.in या वेबसाईटवरुन माहिती घ्या
– एटीएम , क्रेडीट कार्ड वापरताना काळजी घ्या


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close