भ्रष्टाचारी असल्याचा आरोप करत संजय निरुपमांचा तावडेंच्या घराबाहेर मोर्चा

March 2, 2016 9:37 PM0 commentsViews:

´Ö¦ü»ÖãßÖêê äÖߦæüÖê

मुंबई – 02 मार्च : शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या विरोधात मुंबई काँग्रेस आता रस्त्यावर उतरली आहे. विनोद तावडे मंत्री झाल्यावर आजही 6 कंपन्यांमध्ये संचालक आहेत आणि त्यांनी मंत्रिपदाच्या मार्गदर्शक तत्वांचा भंग केला असल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे.

संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसनं आज (बुधवारी) विनोद तावडेंच्या घरावर मोर्चा काढला. विनोद तावडे हे महाराष्ट्र शासनाचा सर्वात भ्रष्टाचार चेहरा आहेत. अशा भ्रष्ट मंत्र्याला त्याच्या पदावरून काढून टाकण्याची आमची मागणी असल्याचं निरूपम यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर, त्यांना जर लाज, लज्जा शरम असेल तर त्यांनी स्वत: पदाचा राजीनामा द्यावा नाहीतर आम्ही मुख्यमंत्र्यांकडे त्यांना काढून टाकण्याची मागणी करू, असा इशाराही संजय निरूपम यांनी दिला आहे.

दुसरीकडे, विनोद तावडे यांनी मात्र संजय निरुपम यांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. निरुपम यांच्याकडे येत्या अधिवेशनात सरकारवर हल्ला करण्यासाठी कोणताच मुद्द नसल्याने, ते अशी राजकीय अंदोलन करत असून मला उगाचच टार्गेट केलं जात असल्याचं तावडे यांनी म्हटलं आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close