साईबाबांचे दर्शन महागले

March 13, 2010 10:19 AM0 commentsViews: 6

13 मार्चशिर्डी साईबाबा संस्थानने आजपासून व्हीआयपींसाठी सशुल्क दर्शन व्यवस्था सुरू केली आहे. यामध्ये व्हीआयपींना दर्शनासाठी 100 रूपये, आरतीसाठी 300 रूपये आणि काकड आरतीसाठी 500 रूपये द्यावे लागणार आहेत. शनिवार, रविवार आणि उत्सव काळात ही सुविधा असेल. मात्र शिफारस पत्र घेऊन येणार्‍यालाच ही सुविधा दिली जाणार असल्याने सर्वसामान्य साई भक्तांनी याविषयी नाराजी व्यक्त केली आहे.

close