युपी फ्रेट कॉरिडॉरसाठी नॅशनल पार्कचा विनाश होऊ देणार नाही -ठाकरे

March 3, 2016 8:42 AM0 commentsViews:

NEWSमुंबई – 03 मार्च : मुंबई ते यूपी फ्रेट कॉरिडॉरच्या प्रकल्पाला मंजुरी मिळाली आहे. पण हा प्रकल्प वादात अडकण्याची चिन्हं दिसत आहे. याचं कारण म्हणजे ही रेल्वे लाईन संजय गांधी नॅशनल पार्कमधून जाणार आहे. याला शिवसेनेचा विरोध आहे. प्रकल्प पूर्ण करा पण त्यासाठी जंगलतोड नको, अशी सेनेची भूमिका आहे. युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी याबाबत विरोध दर्शवला आहे.

संजय गांधी नॅशनल पार्कमधील 10:55 हेक्टर, ठाणे वन विभागाची 16 हेक्टर आणि डहाणू वन विभागाची 31 हेक्टर जमीन या प्रकल्पात बाधीत होणार आहे. प्रकल्पाच्या स्टेज वनला परवानगी देण्यात आली आहे. हा मार्ग संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून जातोय. या रेल्वे मार्गाला वन विभाग, केंद्र सरकार, नॅशनल ग्रीन ट्रिब्यूनलनं परवानगी दिली असून या प्रकल्पाच्या जनसुनवणीसाठी जाहीर करण्यात आला आहे. येत्या 30 दिवसांत या प्रकल्पाच्या हरकती मागवण्यात येणार आहे. 1483 किलोमीटरचा मार्ग असून जपान सरकारच्या आर्थिक सहकार्याने हा प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहे.

आदित्य ठाकरेंचं ट्विट…
“या प्रकल्पाचा मार्ग बदलता येईल. आमचा प्रकल्पाला विरोध नाही पण त्यासाठी संजय गांधी नॅशनल पार्कचा विनाश आम्ही होऊ देणार नाही. मेट्रो यार्ड आणि हा प्रकल्प नॅशनल पार्कमधून नेला तर मुंबईचं मोठं नुकसान होईल.”

दरम्यान, या प्रकल्पाच्या मंजुरीबाबत राज्य सरकारला काही माहित नाहीय, असं दिसतंय. मुंबई-दिल्ली फ्राईट कॅरीडोर मला याविषयी काहीच माहीत नाही अशी प्रतिक्रियाच वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलीये.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close