व्हॉटस्‌अॅपवर लवकरच ‘पीडीएफ’ही पाठवता येणार !

March 3, 2016 11:54 AM0 commentsViews:

whatsapp_pdf03 मार्च : लोकप्रिय मेसेजिंग अॅप असलेल्या व्हॉटस्‌अॅपद्वारे आता लवकरच पीडीएफ फॉरमॅटमधील फाईल पाठविणे शक्य होणार आहे. याबाबत लवकरच व्हॉटस्‌ऍप अपडेटेड व्हर्जन उपलब्ध करून देणार आहे.

इन्स्टंट मेसेजिंग अॅप म्हणून व्हॉटस्‌अॅपने लोकप्रियता मिळविली आहे. जलद गतीने संदेशांची देवाणघेवाण करता येते. संदेशांद्वारे टेक्स्ट, फोटोज्, व्हिडिओज्, फोन क्रमांकही पाठविता येतात. अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारचे डॉक्युमेंट पाठविता येणे शक्य नव्हते. इतर स्पर्धेत असलेल्या इन्स्टंट मेसेंजिंग ऍपमध्ये ही सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे व्हॉटसअॅपही पीडीएफ फाईल पाठविण्याची सुविधा उपलब्ध करून देणार आहे. पीडीएफशिवाय अन्य कोणत्याही फॉरमॅटची फाईल सध्यातरी पाठविता येणे शक्य होणार नाही. व्हॉटस् अॅपच्या पुढील व्हर्जनमध्ये ही सुविधा उपलब्ध असणार आहे. मात्र हे व्हर्जन अद्याप अधिकृतरित्या उपलब्ध झालेले नसून लवकरच ते गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध होईल. त्यानंतर त्याबाबतची सूचना व्हॉटस् ऍपद्वारे येईल.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close