राज्याच्या मागील अर्थसंकल्पातून फक्त 42 टक्के निधी खर्च !

March 3, 2016 1:42 PM0 commentsViews:

03 मार्च : केंद्रीय अर्थसंकल्प नुकताच सादर झालाय. आता 18 मार्चला सादर होणार्‍या राज्याच्या अर्थसंकल्पाकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. यावेळी आयबीएन लोकमतने राज्याच्या मागच्या अर्थसंकल्पाच्या खर्चाचा पाठपुरावा केला. यावेळी मागच्या अर्थसंकल्पामधले फक्त 42 टक्के निधी खर्च झाल्याची धक्कादायक माहिती समोर आलीये.mungantiwar_budget

18 मार्च 2015 .. देवेंद्र फडणवीस सरकारचा पहिला 2 लाख 83 हजार 663 कोटींचा अर्थसंकल्प मांडण्यात आला. शेरोशायरी करत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारांनी घोषणांचा अक्षरशः पाऊस पाडला.

हा अर्थसंकल्प मांडला खरा पण प्रत्यक्षात यामध्ये केलेल्या घोषणासाठी किती पैसे खर्च केले गेले हे सरकारने जाहीर करावं, अशी मागणी सातत्याने केली गेली. आयबीएन लोकमतने केलेल्या पाठपुराव्यातून सरकारी आकडेवारीनुसार या अर्थसंकल्पातली 42 टक्केच रक्कम प्रत्यक्षात खर्च झालीय.

एकूण बजेट
- 2 लाख 83 हजार, 663 कोटीं

खर्च झालेली रक्कम
1 लाख 21 हजार 664. 94 खर्च

सरासरी
42 टक्के

महत्वाचे विभाग

महसूल – 44 टक्के
बांधकाम – 11 टक्के
जलसंपदा – 12 टक्के
अन्न, नागरी पुरवठा – 11 टक्के
गृहनिर्माण – 3.4 टक्के
आदिवासी – 31 टक्के
पर्यावरण – 32 टक्के
सहकार – 47 टक्के
न्याय, विधी – 70 टक्के
वैद्यकीय शिक्षण – 68 टक्के
ग्रामविकास – 51 टक्के
शालेय शिक्षण – 75 टक्के
महिला बालविकास – 61 टक्के

राज्याचा 2016-17 चा अर्थसंकल्प सादर व्हायला आता जेमतेम काही दिवस उरले आहेत. असं असताना किमान 70 टक्के तरी पैसे खर्च होणं अपेक्षित होतं. पण जर आता 42 टक्के टक्केच खर्च झाला असेल तर हे सरकार निष्क्रीय असल्याची टीका विरोधकांनी केलीये.
आता येत्या काही दिवसांमध्ये उर्वरीत रक्कम खर्च करण्यासाठी सरकारकडून धडाका लावला जाईल.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close