पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील मुद्दे

March 3, 2016 1:53 PM0 commentsViews:

modi3

नवी दिल्ली – 03 मार्च : जेएनयू , रोहित वेमुला आत्महत्या प्रकरण आणि विरोधकांच्या आरोपांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज काय बोलणार याकडे देशाचं लक्ष्य लागलं होतं. पंतप्रधान मोदींनी लोकसभेत निवेदन सादर करत काँग्रेसवर एकच हल्लाबोल केला. पण, जेएनयू आणि रोहित वेमुला प्रकरणावर सोईस्करपणे माैन बाळगलं. त्यांच्या भाषणातील ठळक मुद्दे…

 पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील मुद्दे 

– राष्ट्रपती आणि लोकसभेच्या अध्यक्षांचे धन्यवाद, अनेक नवे उपक्रम सुरू केले त्याचा सर्व सदस्यांना फायदा होईल – पंतप्रधान
– लोकसभेत गोंधळ सुरू राहिला तर देशाचं आणि सदस्यांचं नुकसान होतं – पंतप्रधान
– लोकसभा सभागृहात आधी जे काही झालं त्यामुळं देश चिंतेत आहे – पंतप्रधान
– संसद चालली नाही तर सर्वात जास्त नुकसान देशाचं
– कितीही विरोधी मत असलं तरी ते मांडलं पाहिजे – पंतप्रधान
– पंतप्रधान मोदींनी वाचून दाखवलं राजीव गांधींचं भाषण
– संसद बंद पडली तर देशाचं नुकसान होतं असं मत राजीव गांधींनी आपल्या भाषणात व्यक्त केलं होतं – पंतप्रधान
– पंतप्रधानांनी केला राजीव गांधींच्या भाषणाचा उल्लेख – पंतप्रधान
– मोठ्यांनी सांगितलेले सल्ले ऐकले पाहिजे – पंतप्रधान
– आता आपल्याला मोठ्यांनी सांगितलेल्या गोष्टी ऐकल्या पाहिजेत –
– संसदेचं कामकाज झालं पाहिजे हे जवाहरलाल नेहरूंनीही सांगितलं होतं – पंतप्रधान
– लोकसभेत पंतप्रधान मोदींची टोलेबाजी, राजीव गांधी, जवाहरलाल नेहरूंचा उल्लेख करत काँग्रेसला फटकारले
– जीएसटी विधेयक आमचं आहे असं काँग्रेस म्हणतं मग त्याला पाठिंबा का दिला जात नाही ?- पंतप्रधान
– आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या दिवशी फक्त महिला सदस्यांनी बोलावं -पंतप्रधान
– देशाला आमच्याबद्दल सर्व माहित आहे, कोण कुठं आहे, कसा आहे, याची माहिती आहे – पंतप्रधान
– नव्या खासदारांना संसदेत बोलण्याची संधी दिली पाहिजे -पंतप्रधान
– पहिल्यांदा निवडून आलेल्या, सदस्यांना एका सत्रात, एक आठवड्यात बोलण्याची संधी द्यावी – पंतप्रधान
– प्रत्येक अधिवेशनात काही महत्वाच्या विषयांवर चर्चा व्हावी आणि धोरण ठरवावं हे सर्वच सरकारांसाठी गरजेचं आहे – पंतप्रधान
– विरोधकांच्या मनात न्यूनगंड त्यामुळं सभागृह चालू दिलं जात नाही -पंतप्रधान
– अभ्यासू खासदारांना बोलू दिलं जात नाही, पंतप्रधानांचा राहुल गांधींना टोला
– विरोधकांचे अनेक खासदार अभ्यासू आहेत तर काही मनोरंजनही करतात – पंतप्रधान
– मेक इन इंडिया देशासाठी आहे पण तुम्ही त्यांची खिल्ली उडवता -पंतप्रधान
– पंतप्रधानांनी इंदिरा गांधींच्या भाषणाचा केला उल्लेख
– होय, मनरेगा हे आपल्या अपयशाचं प्रतिकच आहे – पंतप्रधान
– आज 60 वर्षानंतरही गरिबांना खड्डे खोदण्यासाठी पाठवलं जातं, हे अपयश नाही तर काय ? – पंतप्रधान
– आम्ही यातल्या कमतरता दूर करण्याचा प्रयत्न करतोय त्यामुळं मनरेगासाठी जास्त पैसे दिले – पंतप्रधान
– गरिबीचं मुळं खूप खोल पोहोचलंय त्यामुळंच गरिबी दूर होऊ शकत नाही आणि याचं श्रेयही काँग्रेसलाच – पंतप्रधान
– 100 दिवस रोजगाराची हमी हे उद्दिष्ट कधीच यशस्वी झालं नाही आम्ही ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय – पंतप्रधान
– तुम्ही आमच्यापेक्षा चांगलं काम कसं करू शकता याचं शल्य काँग्रेसला आहे – पंतप्रधान
– आम्ही काम करतोय याचा विरोध नाही, आपल्यापेक्षा चांगलं काम होईल याची यांना चिंता आहे – पंतप्रधान
– तुम्ही शौचालय बांधले नाही म्हणून आम्ही बांधले -पंतप्रधान मोदी
– तुमची अपूर्ण कामं आम्ही पूर्ण करतोय, पंतप्रधान मोदींचा यूपीएवर घणाघात
– तुम्ही म्हणू शकता ही आमची योजना आहे पण आम्ही अजून म्हणू शकत नाही – पंतप्रधान मोदी
– रेल्वे मी सुरू केली असं मी म्हणू शकत नाही पण तुम्ही म्हणू शकता – पंतप्रधान मोदी
– आमच्या कार्यकाळात राज्यांना 1 लाख 41 हजार 340 कोटी रूपये जास्त दिले, 28 टक्के जास्त रक्कम राज्यांना दिली गेली – पंतप्रधान
– गेली 14 वर्ष आरोप-प्रत्यारोप झेलत आलोय, त्यामुळं आरोपांची सवय झालीय- पंतप्रधान
– पंतप्रधानांचा निर्णय पत्रकार परिषदेत फाडून टाकणं ही कुठली संस्कृती- पंतप्रधान
– दुसर्‍यांना उपदेश देणं सोपं आहे तसं आचरण करणं मात्र कठीण आहे – पंतप्रधान
– अधिकार्‍यांची जबाबदारी वाढवली पाहिजे – पंतप्रधान
– लोकप्रतिनिधींना पाच वर्षात लोकांकडे जावं लागतं – पंतप्रधान
– मात्र अधिकार्‍यांचं तसं नाही, त्यांची कार्यक्षमता आणि जबाबदारी वाढवली पाहिजे – पंतप्रधान
– सरकार येतील आणि जातीलही पण देशासाठी एकत्र येऊन काम केलं पाहिजे – पंतप्रधान


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close