भाजपाच्या राज्यात डान्सबारला अच्छे दिन – राज ठाकरे

March 3, 2016 5:13 PM0 commentsViews:

raj2311

मुंबई – 03 मार्च : राज्यात डान्स बार पुन्हा सुरू होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर विशेषत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहेत. ‘अब कि बार, डान्स बार’ असं म्हणत राज ठाकरे यांनी राज्यशासनावर जोरदार हल्लाबोल केला आहे. राज ठाकरे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून डान्सबारच्या मुद्याला हात घालत राज्य शासनावर शरसंधान साधले आहेत.

डान्स बारमालकांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत छुपा करार झाला आहे, पडद्या पाठीमागे मोठा आर्थिक व्यवहार झाला आहे, असा आरोप करत सरकारचे अब की बार डान्स बार हेच धोरण असल्याची खरमरीत टीका राज ठाकरे यांनी केली आहे. तसंच, डान्सबार सुरू करण्याबाबत राज्य सरकार जितकी आस्था दाखवते तितकी सर्वसामान्यांच्या प्रश्नांबाबत दाखवल्यास जनता त्यांना दुवा देईल, असंही ते म्हणाले.

आजचे मुख्यमंत्री विरोधात असताना डान्स बार बंदीच्या मुदद्यावर तत्कालिन आघाडी सरकारवर तुटून पडायचे. मात्र, आता सुप्रीम कोर्टात बाजू मांडताना कमी पडल्याने राज्यात पुन्हा डान्सबार सुरू होणार आहेत. अशावेळी मुख्यमंत्र्यांचा गृहपाठ कमी पडला की त्यांची इच्छाशक्ती, असा सवाल ठाकरे यांनी ट्विटरवर केला आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close