दरोडेखोराला लोकांनी पकडले

March 13, 2010 11:01 AM0 commentsViews: 2

13 मार्चपिंपरी-चिंचवड परिसरातील भोसरी इथे काल भरदिवसा 4 दरोडेखोरांनी सराफाचे दुकान लुटण्याचा प्रयत्न केला. भर बाजारपेठेत असणार्‍या प्रियंका ज्वेलर्समध्ये 4 सशस्त्र तरुण घुसले. गावठी कट्‌ट्यांचा धाक दाखवून त्यांनी दागिने आणि पैशांची लूटमार केली. मात्र दुकानातून पळून जात असताना, लोकांनी त्यांना पकडले.त्यावेळी या दरोडेखोरांनी दोनवेळा फायरिंग केले. त्यात दुकानाचे मालक कैलास सोळंकी जखमी झाले. पण पळून जाणार्‍या दरोडेखोरांपैकी दोघांना दुकानातले कामगार आणि लोकांना पकडले. इतर दोघे मात्र पळून जाण्यात यशस्वी झाले. दरोडेखोरांपैकी विजय दिलीप चार्य हा एका रेल्वे पोलिसाचा मुलगा आहे. यापूर्वीही त्याच्या नावावर खून, लूटमारीच्या गुन्ह्यांची नोंद आहे. आरोपींवर भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

close