राज्यात आता भाजपचा जलसिंचन घोटाळा?

March 3, 2016 8:18 PM0 commentsViews:

मंगेश चिवटे, मुंबई – 03 मार्च : जलसिंचन घोटाळ्याच्या मुद्द्यावरून सध्याच्या सत्ताधारी भाजपाने विरोधात असताना रान पेटवलं होतं. पण आता सत्तेत आल्यानंतर भाजपनेही निविदांचे आकडे अव्वाच्या सव्वा फुगवल्याचा पुरावे IBN लोकमतच्या हाती लागले आहेत. त्यामुळे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन अडचणीत येण्याची शक्यता आहे.

Girish mahajan1231234

वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील पैनगंगा नदीवरचा हा जलसिंचन प्रकल्प आहे. गेल्या 8 वर्षांत या प्रकल्पाची किंमत तब्बल 8 पटींनी वाढविण्यात आली आहे. जानेवारी महिन्यातच या ठिकाणच्या 11 बॅरेजेसच्या उभारणीला विद्यमान जलसंपदा मंत्री गिरिश महाजन यांनी तब्बल 716 कोटींची सुधारित प्रशासकीय मान्यता दिली. आघाडी सरकारने 2008-09 साली 11 बॅरेजेससाठी 91 कोटी रूपयांची मान्यता दिली होती. सिमेंट आणि स्टीलच्या किंमती वाढल्या तरी, तब्बल 8 पटीनं प्रकल्पाची किंमत कशी काय वाढू शकते, असा सवाल विरोधकांनी केला आहे.

एकीकडे प्रकल्पावर अव्वाच्या सव्वा पैसे खर्च केले जातायत. पण या प्रकल्पात ज्यांच्या जमिनी गेल्या त्यांना मात्र हक्काच्या नुकसान भरपाईसाठी कोर्टाची पायरी चढावी लागली.

जलसिंचन प्रकल्पांच्या निविदा अव्वाच्या सव्वा फुगवणे आणि आपल्या मनपसंद ठेकेदारालाच काम देणं, हे आघाडी सरकारचंच धोरण युती सरकारही राबवत असल्याचं दिसतं आहे. त्यामुळेच सुनिल तटकरे आणि अजित पवार या माजी जलसंपदामंत्र्यांवर एसीबीसमोर चौकशीला जाण्याची जी वेळ आली तीच वेळ गिरिश महाजन यांच्यावरही आली तर आश्चर्य वाटालया नको.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close