मुंबईत मणिपूरच्या मुलीला भर रस्त्यात मारहाण, आणि विनयभंग

March 3, 2016 6:48 PM0 commentsViews:

rape dsngfsdg

मुंबई – 03 मार्च : मणिपूरमधील 26 वर्षांच्या तरुणीचा अज्ञात व्यक्तीने मुंबईत भर दिवसा विनयभंग करून मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंबईतील कलिना परिसरात गेल्या शनिवारी ही घटना घडली. मुंबई पोलिसांनी सुरुवातीला या प्रकरणात अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता. मात्र, मीडियाने या प्रकरणात हस्तक्षेप केल्यानंतर अज्ञात व्यक्तीविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

संबंधित तरुणी मेकअप आर्टिस्ट असून गेल्या 5 वर्षांपासून मुंबईत स्थायिक आहे. शनिवारी संध्याकाळी एका मैत्रिणीबरोबर जात असताना एक अनोळखी व्यक्तीने तिच्या बरोबर छेडछाड केली. याला त्या तरुणीने विरोध करण्याचा प्रयत्न केला असता त्या व्यक्तीने तिला मारहाण केली. शिवाय तिचे केस पकडून तिला फरफटत नेले. यावेळी परिसरातील कोणत्याही व्यक्तीने आरोपीला अडवण्याचा प्रयत्न केला नाही. मात्र पोलिसांनी तक्रार नोंदवून घेण्यासच प्रथमदशच् नकार दिला. परंतु, मीडियाने ही घटना लावून धरल्यानंतर पोलिसांनी चार दिवसांनंतर आरोपींविरोधात एफआयआर दाखल केला.

यानंतर ती एफआयआर नोंदवायला जेव्हा वाकोला पोलीस ठाण्यात गेली. या प्रकरणात अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता. मात्र, मीडियाने या प्रकरणात हस्तक्षेप केल्यानंतर अज्ञात व्यक्तीविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सुरू आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close