मुंबई-दिल्ली फ्राईट कॅारिडोर उठणार संजय गांधी नॅशनल पार्कच्या मुळावर?

March 3, 2016 10:15 PM0 commentsViews:

प्रफुल्ल साळुंखे, मुंबई- 03 मार्च :

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून प्रस्तावीत असलेल्या मुंबई-दिल्ली फ्राईट कॅारीडोर तयार करताना संवेदनशील अशा पर्यावरण संरक्षण कायद्यालाच बगल देण्यात आली आहे. केंद्र सरकार बहुमताच्या जोरावर अनेक प्रकल्प राबताना कायद्याच अस्तित्व धोक्यात आणतंय, असा आरोप पर्यावरण प्रेमींनी केला आहे.

sanjay-gandhi-national-park-e1444705517534

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून प्रस्तावीत असलेल्या मुंबई-दिल्ली फ्राईट कॅरीडोर या रेल्वे मार्गाला वन विभाग, केंद्र सरकार, नॅशनल ग्रीन ट्रिब्यूनलने परवानगी दिली आहे. जेएनपीटी-उत्तर प्रदेशातील दादरी असा 1483 किलोमीटरचा हा मार्ग असणार आहे. या मार्गावरील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची 10.55 हेक्टर, ठाणे वनविभागाची 16.17 हेक्टर आणि डहाणू वनविभागाची 31.11 हेक्टर जमीन, या प्रकल्पात बाधीत होणार आहेत. या पेक्षाही या मार्गावरील रेल्वे वाहतूकीमुळे जंगली प्राण्यांच्या वावरण्यावरही मर्यादा येणार आहेत.

हा प्रकल्प करताना पर्यावरण संरक्षण कायदा 1986च्या परवानगीची आवश्यकता नाही, अस केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे.

फ्राईट कॅारिडोर प्रकल्पाचे नियम
*पर्यावरण कायदाच लागू होणार नाही
* प्रकल्पाच्या जनसुनावणीत जिल्हाधिकार्‍यांचं स्थान नगण्य असेल
* प्रकल्पाची इत्थंभूत माहिती स्थानिकांना देणं बंधनकारक
* प्रकल्पाची माहिती मराठीतच असणं गरजेचं
* जनसुनावणीची मुदत 90 दिवसांवरून 30 दिवस करण्यात आली आहे.

दरम्यान, जनतेला विकास हवा. पण जर विकास पर्यावरणाचा हत्या करून होणार असेल तर तो भावीपिढीसाठी वरदान नाही तर शाप ठरेल.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close