लोकसभेचे माजी अध्यक्ष पी.ए. संगमा यांचे निधन

March 4, 2016 2:05 PM0 commentsViews:

M_Id_396426_PA_Sangma

नवी दिल्ली – 04 मार्च : लोकसभेचे माजी अध्यक्ष पी. ए. संगमा यांचे आज सकाळी ह्रदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. ते 68 वर्षाचे होते. दिल्ली येथील राहत्या घरातच संगमा अनंतात विलीन झाले.

पी. ए. संगमा हे आपल्या राजकारणाच्या जीवनाची सुरूवात काँग्रेस पक्षापासून केली. मात्र, काही वैचारीक मतभेद झाल्यानंतर संगमा यांनी राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाण्याचे ठरविले. राष्ट्रवादी पक्षाच्या स्थापनेत त्यांचे मोठे योगदान होते. तसेच देशाच्या राजकारणातदेखील त्यांनी भरीव काम केले होते. अचानकपणे संगमा यांचे मृत्यू झाल्याने नॉर्थईस्टच्या भागात पोकळी निर्माण झाली आहे. त्यानंतर 8 तारखेपर्यंत लोकसभा पुढे ढकलन्यात आली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close