राजस्थान रॉयलसमोर 213 रन्सचे टार्गेट

March 13, 2010 11:23 AM0 commentsViews: 3

13 मार्च डीएलएफ आयपीएलमध्ये आज मॅच रंगतेय ती सचिन तेंडुलकरच्या मुंबई इंडियन्स आणि शेन वॉर्नच्या राजस्थान रॉयल दरम्यान. पहिली बॅटिंग करणार्‍या मुंबई इंडियन्सने धुवाँधार बॅटिंग करत राजस्थान रॉयलसमोर 213 रन्सचे टार्गेट ठेवले आहे. सचिन तेंडुलकर आणि सनथ जयसूर्या या ओपनिंगच्या जोडीने जोरदार सुरुवात केली. ओव्हरमागे 10 रन्सच्या ऍव्हरेजने खेळत या जोडीने 3 ओव्हरमध्ये 38 रन्स केले. पण यानंतर जयसूर्या 23 तर सचिन 17 रन्सवर आऊट झाले. पण नवोदित अंबाती रायडू आणि सौरभ तिवारी या जोडीने तुफान फटकेबाजी करत मुंबई इंडियन्सला 200 रन्सचा टप्पा पार करुन दिला. नायडू 55 तर तिवारी 53 रन्सवर आऊट झाले.

close