मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी

March 4, 2016 2:40 PM0 commentsViews:

MUMBAI RAIN (7)

मुंबई- 03 मार्च : गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या विविध भागांत अवकाळी पावसानं आणि गारांनी थैमान घातला असताना, आज पहाटेपासून मुंबई काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली.

मुंबई उपनगरांसह, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाची संततधार सुरू आहे. बोरिवली, कांदिवली, मालाड परिसरात रिमझिम सरी बरसल्या असून कल्याण-डोंबिवली, बदलापूर भागात पावसाच्या सरी कोसळल्या. ठाण्यात सकाळी पावसानं हजेरी लावल्यानं वातावरणात गारवा पसरला आहे. पालघरमध्येही जोरदार अवकाळी पाऊस बरसला असून वसई-विरारमध्ये रात्रीपासूनच धुवाधार पाऊस पडतोय.

दरम्यान, गेले चार दिवस नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात गारपिटीसह अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. नाशिक, निफाड, इगतपुरीमध्ये रात्रभर वादळी वार्‍यासंह पाऊस कोसळला असून काही भागात गारपीटही झाली. जोरदार पावसाच्या तडाख्यामुळे शहराच्या काही भागात वीजपुरवठाही खंडीत झाला आहे. पुण्याच्याही काही भागात पाऊस पडतोय. या अवकाळी पावसामुळे द्राक्षासह कांदा, गहू, हरभरा व भाजीपाल्याचेही नुकसान झाले असून आंब्याच्या झाडावरील मोहोर गळून पडला आहे. औरंगाबादमध्येही पावसाच्या सरी पडल्यानं तीव्र पाणीटंचाईचा सामना करणार्‍या नागरिकांना किंचित दिलासा मिळाला आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close