सौरवला 9 लाखांचा दंड

March 13, 2010 12:07 PM0 commentsViews: 3

13 मार्चआयपीएलच्या दुसर्‍या हंगामात सर्वात तळाला असणार्‍या कोलकाता नाईट रायडर्सच्या टीमने गतविजेत्या डेक्कन चार्जर्सना पहिल्याच मॅचमध्ये पराभवाचा धक्का दिला आहे. पण या विजयाला धक्का बसला आहे. कोलकाता नाईट रायडर्सचा कॅप्टन सौरव गांगुलीला दंड ठोठावण्यात आला आहे. धिम्या गतीने ओव्हर्स टाकल्याने त्याला हा दंड ठोठावण्यात आला. गांगुलीला 20 हजार डॉलर्स म्हणजेच 9 लाख रूपये इतका दंड भरावा लागणार आहे. दुसर्‍या इनिंगमध्ये केकेआर नियोजित वेळेपेक्षा 3 ओव्हर मागे असल्याचे लक्षात आले. आणि नियमांनुसार धिम्या गतीने बॉलिंग टाकल्याबद्दल त्या टीमच्या कॅप्टनला दंड भरावा लागतो.

close