पोटच्या मुलीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशय, जातपंचायतीची आमानुष शिक्षा

March 4, 2016 5:04 PM0 commentsViews:

 

सातारा – 04 मार्च : वाई तालुक्यातील पाचवड इथे गोपाळ जातपंचायतीचं क्रुर रूप पुन्हा एकदा समोर आलं आहे. बापाचा स्वत:च्या मुलीसोबत अनैतिक संबंध ठेवल्याच्या संशयावरून, या जात पंचायतीनं त्या मुलीला आणि तिच्या वडिलांना भर पंचायतीमध्ये आमानुष मारहाण केली आहे.

Ë×ÖêêËÖêy

सख्ख्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपावरुन भरपंचायतीत अत्याचारी बापाला आणि त्याच्या मुलीलाही दोरखंडानं बांधून जनावरांप्रमाणे मारहाण करण्यात आली. तसंच 7 हजारांचा दंडही ठोठावण्यात आला. हा सगळा प्रकार सुरू असताना अख्खा समाज बघ्याच्या भूमिकेत होता.

दरम्यान, माहिती अधिकार कार्यकर्ते सचिन भिसेंनी हा प्रकार मोबाईलमध्ये कैद करुन पोलिसात तक्रार दिली. या प्रकरणी भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. IBN लोकमतने या बातमीचा पाठपुराव्यानंतर भुईंज पोलिसांनी 6 जणांना अटक केली असून पुढचा तपास सुरू आहे. दरम्यान, जातपंचायतीचे भूत अजूनही लोकांच्या मानगुटीवरून जात नसल्याचे जळजळीत वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close