अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचं शुभमंगल

March 4, 2016 5:53 PM0 commentsViews:

मुंबई- 04 मार्च : बॉलीवुडमध्ये गुपचुप लग्न करण्याचा सध्या ट्रेंडच सुरू झालाय. बॉलीवुडची प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला मातोंडकर ही सुद्धा आता प्रीतीपाठोपाठ विवाहबंधनात अडकली आहे. काश्मिरचा बिझनेसमॅन आणि मॉडेल मोहसीन अख्तर मीर सोबत उर्मिलाने काल (गुरूवारी) वांद्रे येथे आपल्या राहत्या घरी मित्रपरिवारांच्या साक्षीने लग्न केलं.

उर्मिलाच्या विवाह बाबतीत कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. एका हॉटेलमध्ये छोटेखानी समारंभात अगदी मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडला. उर्मिलाचा जवळचा मित्र आणि सुप्रसिद्ध फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रा विवाह समारंभाला उपस्थित होता. मात्र बॉलिवूड कलाकारांपैकी कोणालीही तिने लग्नाला बोलवलं नव्हतं.

खरंतरं उर्मिला आणि मोहसीन या दोघांची भेट 2014 साली मनीष मल्होत्राच्या भाचीच्या लग्नात झाली. त्यानंतर एकमेकांचा परिचय, भेटी- गाठी वाढल्या आणि बघता बघता ते एकमेकांच्या प्रेमात पडले आणि तेव्हापासून हे दोघं एकत्र आहेत.

मोहसीन हा उर्मिलापेक्षा तब्बल 9 वर्षांनी लहान आहे. बिझनेसमॅन असलेल्या मोहसीनला मॉडेलींग आणि ऍक्टिंगचीही आवड आहे. फरहान अख्तरच्या ‘लक बाय चान्स’ सिनेमामध्ये त्याने छोटी भुमिका देखील साकारली होती. त्यासोबतच त्याने बर्‍याच छोट्या मोठ्या जाहिरातीही केल्या आहेत.

विशेष म्हणजे उर्मिलाचं लग्न हिंदु आणि मुस्लिम अशा दोन्हीही पध्दतीने करण्यात आलं. उर्मिला लवकरच मुंबईमध्ये रिसेप्शनपार्टी आयोजित देणार आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close