हॅपी बर्थ डे…टॉम ऍन्ड जेरी!

March 13, 2010 12:54 PM0 commentsViews: 23

13 मार्चसर्वांचे लाडके टॉम ऍन्ड जेरीचा आज वाढदिवस आहे. अर्थात त्यांचा आज सत्तरावा वाढदिवस आहे. या टॉम ऍन्ड जेरीने प्रत्येक घरातील बच्चे कंपनीला आपल्या टीममध्ये कधीच सामील करुन घेतले आहे. मांजर आणि उंदराच्या या जोडीने देशोदेशीच्या मुलांनाच नव्हे तर अगदी आबाल वृद्धांना एवढी वर्षे वेड लावले आहे. 1939मध्ये हना बार्बरा यांनी टॉम ऍन्ड जेरीची ऍनिमेटेड कार्टून फिल्म आणली. जेरीचा पाठलाग करणारा टॉम आणि त्याला नेहमी चकवा देणारा जेरी अशी ह्या कार्टून फिल्मची थीम आहे. ऍनिमेशन, थीम अशा सगळ्याच पातळीवर या कार्टून फिल्मने प्रचंड लोकप्रियता मिळवली. 70 वर्षांनंतर आजही टॉम ऍन्ड जेरी तेवढाच एव्हरग्रीन आहे

close