5 राज्यांतील विधानसभा निवडणुकीची घोषणा, 19 मेला मतमोजणी

March 4, 2016 6:57 PM0 commentsViews:

nazim Zaidi

नवी दिल्ली – 04 मार्च : राष्ट्रीय निवडणूक आयोगाने देशाच्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांची घोषणा केली. त्यानुसार केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, पाँडेचरी आणि आसाम या 5 राज्यात विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त नझीम झैदी यांनी पत्रकार परिषद घेऊन आचारसंहिताही जाहीर केली आहे.

आसाम
आसाममध्ये दोन टप्प्यात ही निवडणूक होणार आहे. 4 एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यासाठी 65 जागांसाठी मतदान घेण्यात येत आहे. तर 11 एप्रिल रोजी 61 जागांसाठी दुसरा टप्पा पार पडणार आहे.

पश्चिम बंगाल
पश्चिम बंगालमध्ये 6 टप्प्यांत विधानसभेसाठी मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात 4 व 11 एप्रिल रोजी मतदान होत असून दुसर्‍या टप्प्यात 17 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. 21 एप्रिल रोजी निवडणुकांचा तिसरा टप्पा पार पडणार आहे. तसेच 25 एप्रिल रोजी चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडेल. तर पाचव्या टप्प्यासाठी 30 एप्रिल आणि सहाव्या टप्प्यासाठी 5 मे रोजी मतदान होऊन मतदानाची निवडणूक प्रकिया पार पडेल.

केरळ
केरळमध्ये 16 मे रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे.

तामिळनाडू आणि पाँडेचरी
तामिळनाडू आणि पाँडेचरीतही 16 मे रोजीच मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

सर्व ठिकाणी मतमोजणी – १९ मे

19 मे रोजी सर्वच पाचही राज्यांतील निवडणुकांच्या मतदानाचे निकाल हाती येणार आहेत.

निवडणूक जाहीर करण्यात आलेल्या पाचही राज्यात विधानसभेच्या एकूण 824 जागांसाठी मतदान होत आहे. आसामच्या 126 जागांसाठी तर पाँडेचरीमध्ये 30 जागांसाठी मतदान होईल. पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक 294 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. तसेच तामिळनाडूमध्ये 234 जागांसाठी उमेदवार आपले भविष्य आजमावणार आहेत. निवडणुकांच्या तारखांची घोषणा होताच, आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. तर 5 राज्यांतील विधानसभेच्या या निवडणुकांसाठी 17 कोटी नागरिक आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close