अफझल गुरू नाही तर रोहित वेमुला माझा आदर्श – कन्हैय्या कुमार

March 4, 2016 8:10 PM0 commentsViews:

ÛúÖê»ÖÝÖ²ÖÖê ê¯ÖÖê

नवी दिल्ली – 04 मार्च : अफझल गुरू हा स्वतंत्र भारताचा नागरिक होता. त्याने देशविरोधी कृत्य केलं आणि संविधानाने त्याला शिक्षा दिली. त्यामुळे अफझल गुरू हा माझा आदर्श नसून रोहित वेमुला हा माझा आदर्श आहे, असं जेएनयूचा अध्यक्ष कन्हैय्या कुमारने सांगितलं. तसंच रोहिम वेमुलाचे बलिदान वाया जाऊ देणार नाही. काही लोकांच दबावाचं राजकारण मोडून काढायचं आहे, असं तो म्हणाला.

देशद्रोहाचा आरोप असलेल्या कन्हैया कुमार याला दिल्ली हायकोर्टाने 6 महिन्यांचा अंतरिम जामीन मंजूर केल्यानंतर आज ( शुक्रवारी) त्याने जेएनयू विद्यापीठाच्या परिसरात पत्रकार परिषद घेतली.

जेएनयूतील कोणताही विद्यार्थी देशविरोधी नाही. पंतप्रधानांशी वैचारिक मतभेद आहेत पण मनभेद नाहीत. आम्ही दहशतवादी नाही. आम्ही तुमच्या मुलांसारखेच आहोत, असंही तो म्हणाला. हे सारे भाजपचे कारस्थान! विद्यापीठात 9 फेब्रुवारी रोजी घडलेल्या प्रकरणाचा आम्ही निषेध करतो. तो देशद्रोह होता की नाही न्यायालयाला ठरवू द्या. आमचा देशाच्या संविधानावर आणि न्याय व्यवस्थेवर पूर्णपणे विश्वास आहे, असं मत त्याने व्यक्त केलं आहे.

याशिवाय, मी राजकारणी नसून विद्यार्थी आहोत पण देशात दलितांवर अन्याय, हक्कांवर गदा आणि रोहित वेमुलासारखी प्रकरणे घडत असतील तर त्याविरोधात आवाज उठवल्याशिवाय राहणार नाही, असंही तो पुढे म्हणाला.

सर्व आरोप चुकीचे संविधान हा काही व्हिडिओ नाही की ज्यात फेरफार करता येईल, असा टोला लगावत कन्हैयाने आपल्याविरोधातील देशद्रोहाचा आरोप फेटाळून लावला. दहशतवादी असल्यासारखी आमची प्रतिमा तयार केली गेली. दलित आणि शेतकर्‍यांसाठी लढणं हा जर अपराध असेल तर होय मी अपराधी आहे, असंही तो पुढे म्हणाला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close