‘भारतकुमार’ यांना दादासाहेब फाळके पुरस्कार

March 4, 2016 8:43 PM0 commentsViews:

d8303907ba49f63b832dfafa65c1303b

04 मार्च : बॉलीवुडमध्ये ‘पूरब और पश्चिम’,’उपकार’,’क्रांती’सारख्या देशभक्तीच्या चित्रपटातुन प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे सुप्रसिद्ध अभिनेते-निर्देशक मनोज कुमार यांना फिल्म इंडस्ट्रीतल्या अतुल्य योगदानाबद्दल दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात येणार आहे.

78व्या वर्षी हा पुरस्कार मिळवणारे हे 47 वे व्यक्ती आहे. भारतीय सिनेसृष्टीच्या या सर्वोच्च पुरस्कारात एक सुवर्ण कमळ, 10 लाख रोख रक्कम आणि शाल दिली जाते. मनोज कुमार हे ‘हरिआली और रास्ता’, ‘वो कौन थी’, ‘हिमालय की गोद में’, ‘दो बदन’, ‘उपकार’, ‘पूरब और पश्चिम’, ‘पत्थर के सनम’, ‘शहिद’, ‘रोटी कपडा और मकान’ या चित्रपटातुन प्रेक्षकांमध्ये प्रसिद्ध झाले.

मनोज कुमार यांचे खरं नाव हरिकिशन गिरी गोस्वामी आहे. मात्र, चित्रपटसृष्टीत पदार्पण केल्यावर त्यांनी नाव बदलून मनोज कुमार केलं. त्यांचा जन्म एबटाबाद येथे झाला होता. (जो भारत पाकिस्तान फाळणीआधी भारताचा भाग होता)मनोज कुमार यांनी ‘काच कि गुडिआ’ या 1960 साली आलेल्या चित्रपटातुन नायकाच्या रूपात पदार्पण केलं. पण त्यानंतर ते देशभक्तीवर आधारीत असलेले चित्रपट करू लागले. म्हणुन लोकं त्यांना ‘भारतकुमार’ या नावाने ओळखू लागले. 60 ते 70 च्या दशकात मनोज कुमार यांच्या सिनेमाला यश मिळालं. त्यांच्या ‘उपकार’ या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला आहे. तसेच 1992 ला भारत सरकारकडून पद्मश्रीही मिळाला आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close