राज्यात गेल्या वर्षी 3228 शेतकर्‍यांची आत्महत्या – राधामोहन सिंह

March 4, 2016 9:13 PM0 commentsViews:

farmer suicide

नवी दिल्ली – 04 मार्च : राज्यात 2015 साली 3,228 शेतकर्‍यांनी आत्महत्या केली असून गेल्या 14 वर्षातला शेतकरी आत्महत्येचा हा सर्वात जास्त आकडा असल्याची माहिती केंदि्रय कृषि मंत्री राधामोहन सिंह यांनी दिली आहे. राज्यसभेत विजय दर्डा यांच्या प्रश्नाला लिखीत उत्तर देताना राधामोहन सिंग यांनी ही माहिती दिली आहे.

औरंगाबाद विभागात सर्वात जास्त शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. आकडेवारीनुसार औरंगाबाद विभागात 1130, अमरावती विभागात 1179, नाशिक विभागात 459, नागपूर विभागात 362, पुणे विभागात 69 आणि कोकणा विभागात 2 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याचं त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर, केंद्र आणि राज्य सरकार शेतकर्‍यांची आत्महत्या रोखण्यासाठी वेगवेगळ्या योजना आखत असल्याची माहितीही यांनी दिली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close