प्रकल्पाची जमीन शेतकर्‍यांना परत देण्याचे आदेश

March 13, 2010 1:09 PM0 commentsViews: 5

13 मार्चरायगड जिल्ह्यातील 60 हेक्टर जमिनी शेतकर्‍याना परत करण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी सूर्या रोशनी या कंपनीला दिले आहेत.दिलेल्या वेळेत प्रकल्प उभारला नाही म्हणून हे आदेश देण्यात आलेत. प्रकल्पासाठी घेतलेली जमीन परत करावी लागण्याची ही राज्यातील पहिलीच घटना आहे. रायगडमध्ये अनेक प्रकल्प येत आहेत. 13 वर्षापूर्वी सूर्या रोशनी कंपनीने प्रकल्पासाठी 3 गावांतील जमीन संपादित केली होती. 5 वर्षे होऊनही कंपनी गावात आली नाही. तसेच या कंपनीने परस्पर ही जमीन दुसर्‍या कंपनीला विकली. शेतकर्‍यांच्या हे लक्षात आल्यावर त्यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे धाव घेतली. त्यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी ही जमीन शेतकर्‍यांना परत देण्याचे आदेश सूर्या कंपनीला दिले.

close