डोंबिवली एमआयडीसीत केमिकल कंपनीला भीषण आग

March 5, 2016 12:52 PM0 commentsViews:

vlcsnap-2016-03-05-12h41m24s80

मुंबई – 05 मार्च : डोंबिवली एमआयडीसीमधील अल्ट्रा प्युअर फेम या केमिकल कंपनीला आज सकाळी भीषण आग लागल्यानं एकच खळबळ उडाली होती. तब्बल चार तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं. सुदैवानं, या आगीत जीवितहानी झालेली नाही, परंतु कंपनी जळून खाक झाली आहे.

मानपाडा परिसरातील अल्ट्रा प्युअर फेम या केमिकल कंपनीत सकाळी साडेनऊच्या सुमारास ही आग लागली होती. आगीच्या ज्वाला आणि धुराचे लोट दूर अंतरावरून स्पष्ट दिसत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कंपनीशेजारी असणार्‍या सिलिंडरच्या गोदामामुळे ही आग आणखी भडकण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. मात्र, अग्निशमन दल आणि कंपनीतील कर्मचार्‍यांनी युद्धपातळीवर गोदामातील 153 सिलेंडर्स सुरक्षित स्थळी हलविल्याने हा अनर्थ टळला.

अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्नांची शर्थ करत आग नियंत्रणात आणली आणि सगळ्यांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close