ईपीएफवरच्या टॅक्सचा पुनर्विचार करा, पंतप्रधानांची जेटलींना सूचना

March 5, 2016 3:02 PM0 commentsViews:

modi2

नवी दिल्ली – 04 मार्च : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेवरून केंद्रीय अर्थसंकल्पातील प्रस्तावित ईपीएफ टॅक्स मागे घेतला जाणार असल्याची माहिती राजधानीतील उच्चस्तरीय सुत्रांकडून मिळाली आहे. अर्थसंकल्पातील ईपीएफ टॅक्सबाबत देशभरात बरीच ओरड झाल्यानंतर पंतप्रधानांनी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांना आपल्या प्रस्तावाचा पुनर्विचार करण्याची सूचना केली आहे.

ईपीएफ टॅक्सवर फक्त विरोधी पक्ष किंवा कामगार संघटनाच नव्हे तर भाजपमधूनही मोठा विरोध झाला होता. 2-3 दिवसांपूर्वी पंतप्रधान कार्यालयात प्रस्तावित ईपीएफ टॅक्सबाबत एक उच्चस्तरीय बैठक झाली. त्यामध्येच पंतप्रधानांनी अर्थमंत्री जेटली यांना ईपीएफ करप्रस्तावाचा पुनर्विचार करण्याची सूचना केली. त्यानुसार अर्थमंत्री जेटली यांनी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांना संसदेत निवेदन करण्याविषयीचं पत्रही दिलं होतं. मात्र काल माजी लोकसभा अध्यक्ष पी ए संगमा यांच्या निधनाचं वृत्त आल्यानंतर सभागृहाचं कामकाज 2 दिवसांसाठी तहकूब करण्यात आलं. त्यामुळे आता जेटली प्रस्तावित ईपीएफ टॅक्सबाबत मंगळवारी सभागृहात निवेदन करण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता अरूण जेटली संसदेत नेमकं काय निवेदन करतात, हे पाहणं महत्वाचं आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close