‘रॉकी हँडसम’चा ट्रेलर लाँच

March 5, 2016 5:12 PM0 commentsViews:


05 मार्च : बॉलीवुडचा ऍक्शन मॅन जॉन इब्राहिमचा आगामी चित्रपट रॉकी हॅडसमचा ट्रेलर लॉच झालाय.या चित्रपटात कमल हसन यांची मुलगी श्रुती हसन हि नायिकेच्या भुमिकेत आहे. ट्रेलरआधी या चित्रपटाचा टिजरला पाहुन प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली होती. 25 मार्चला रिलीज होणारा ‘रॉकी हॅडसम’ हा जॉनच्या आधीच्या चित्रपटाच्या तुलनेने ऍक्शनने भरलेला असेल.

रॉकी हॅडसम या चित्रपटातून जॉन सिक्स पॅक्स दाखवत खुपच फिट दिसुन येतोय. जॉनने आपल्या फेसबुक अकाउंटवर, रॉकी हॅडसम हा चित्रपट ह्या वर्षातील सर्वात मोठी ऍक्शन फिल्म असेल आणि भारतीय प्रेक्षकंाच्या पंसतीला नक्कीच पडेल,असंही म्हटलंय.
फोर्स आणि दृश्यम या चित्रपटाचे दिग्दर्शक निशिकांत कामत यांनी सिनेमाच दिग्दर्शन केलंय. तसंच आधीच्या चित्रपटांसारखाच रॉकी हॅडसमलाही प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळेल असंही त्यांनी आश्वासान दिलंय.तसंच विकी डोनर आणि मद्रास कॅफे नंतर जॉन आता रॉकी हॅडसमही प्रोड्युस करतोय.

रॉकी हॅडसममध्ये शरद केळकर, नथालिया कौर, दिया चालवाड, झुबेर नाझीर सांरखी छोटी स्टारकास्टही दिसेल. तर ‘द मॅन फ्रॉम नोवेअर’ या कोरीयन फिल्मचा हा हिंदी रिमेक असल्याची सध्या चर्चा सुरू आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close