मुंबई इंडियन्सची विजयी सलामी

March 13, 2010 2:17 PM0 commentsViews: 6

13 मार्चआयपीएलच्या तिसर्‍या हंगामात सचिन तेंडुलकरच्या मुंबई इंडियन्सने विजयी सलामी दिली आहे. जबरदस्त चुरशीच्या झालेल्या मॅचमध्ये मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्सचा 4 रन्सने पराभव केला. पहिली बॅटिंग करणार्‍या मुंबई इंडियन्सने 6 विकेट गमावत 212 रन्स केले. आणि याला उत्तर देताना राजस्थान रॉयल्सला 7 विकेट गमावत 208 रन्स करता आले. राजस्थान रॉयलची सुरुवात खराब झाली. पण यानंतर युसुफ पठाणने अवघ्या 37 बॉलमध्ये 100 रन्स करत मॅचमध्ये जबरदस्त चुरस निर्माण केली. आयपीएलमधील ही फास्टेस्ट सेंच्युरी ठरली. पण यानंतर तो आऊट झाला. आणि मॅच शेवटच्या ओव्हरपर्यंत रंगली. मुंबई इंडियन्सतर्फे लसिथ मलिंगाने सर्वाधिक 2 विकेट घेतल्या. याआधी पहिली बॅटिंग करणार्‍या मुंबई इंडियन्सतर्फे सौरभ तिवारी आणि अंबाती रायडूने तुफान बॅटिंग करत मुंबई इंडियन्सला भक्कम स्कोअर उभा करुन दिला. तिवारीने 53 तर रायडूने 55 रन्स केले.

close