भाजप सरकार सत्तेवर आलं हे पत्रकारांचेच पाप, सिद्धराम म्हेत्रेंची आदळआपट

March 6, 2016 2:34 PM0 commentsViews:

mehtr06 मार्च : माजी गृहराज्यमंत्री आणि काँग्रेसचे आमदार सिद्धराम म्हेत्रे यांनी एका मोर्चामध्ये मुक्ताफळं उधळली आहे. त्यांच्या मते भाजप सरकार सत्तेत आले ते पत्रकारांचेच पाप आहे. तुम्ही लिहून लिहून हे सरकार सत्तेत आणलं आणि पापाचे धनी झालात अशी टीकाच म्हेत्रे यांनी केलीये.

याशिवाय तुमच्यावर बसलेले बाप दुष्काळाबाबत न लिहिता इतर काहीही लिहितात अशी जीभही त्यांची घसरली. दुष्काळी स्थितीविरोधात जिल्हा काँग्रेसतर्फे काढण्यात आलेल्या मोर्चात बोलताना त्यांनी ही मुक्ताफळं उधळली. काँग्रेस नेते सिद्धराम म्हेत्रे हे एवढ्यावरच न थांबता त्यांनी सत्ताधारी आणि त्यांची मुलं तसंच पत्रकारांवरही तोंडसूख घेतलं. ते म्हणाले की, हे सताधारी आणि त्यांच्या मुलांना किडे पडून मरतील अशीही मुक्ताफळे उधळलीत. म्हेत्रे यांच्यासारख्या लोकप्रतिनिधी असलेल्या व्यक्तीच्या या वक्तव्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जातोय. त्यामुळे काँग्रेस पक्ष अशा वाचाळवीरांना आवर कसा घालणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close