सचिनच्या पत्राने मुंबई पालिका भारावली, जनजागृती जाहिरातीसाठी घातलं साकडं

March 6, 2016 3:38 PM0 commentsViews:

sachin_letterमुंबई – 06 मार्च : काही दिवसांपूर्वी मुंबई डंपिंग ग्राऊंड संदर्भात मुंबई महापालिकेला क्रिकेटर सचिन तेंडुलकरनं पत्र लिहलं होतं. अखेर सचिन तेंडुलकरच्या पत्राचं पालिकेनं उत्तर दिलं. पण पत्राचा शेवट करताना मात्र पालिकेच्या विविध जनजागृती विषयक जाहिरातीत सचिननं सहभागी व्हावं असं निमंत्रणच दिलं गेलंय.

सचिनचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. त्यानं जर एखादं ऍड कॅम्पेन करायचं ठरवलं तर त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणावर होईल असा विश्वास पालिकेनं व्यक्त केला. याआधी पालिकेनं सचिन क्रिकेटमध्ये सक्रीय खेळत असताना सचिनचा सत्कार करण्यासाठी वेळ मागितला होता पण अनेक पत्रव्यवहार करुनही त्यानं तो दिला नाही. आता सचिनचं पत्र आलं ते पाहताच किमान त्यानं एखादं ऍडकॅम्पेन करावं असं विनंतीवजा पत्रात लिहिलं गेलंय. हे पत्र मराठीत लिहिलं असून देवनार आणि इतर डंपिंग ग्राउंडवर काय काम केली जातायत याचा उल्लेख केला गेलाय. देवनार डंपिंग ग्राउंडवर कचर्‍यापासून विजनिर्मिती करण्याच्या प्रयत्नात याचा उल्लेख आहे. त्याचबरोबर या ग्राउंडभोवती संरक्षक भिंतही बांधली जातेय असंही म्हणण्यात आलं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close