यू मुम्बाचं स्वप्नं पुन्हा भंगलं, पाटणा पायरेट्स प्रो कबड्डीचे चॅम्पियन्स

March 6, 2016 5:00 PM0 commentsViews:

patna06 मार्च - प्रो कबड्डी लिगमध्ये यू मुम्बाचं सलग दुसर्‍यांदा अजिंक्यपद पटकावण्याच स्वप्न भंग झालंय. पाटण्याविरूद्ध झालेल्या फायनलमध्ये यू मुम्बाला 28 – 31 अशा पराभवाला सामोरं जावं लागलं.

पाटण्यानं सुरवातीलाच सामन्यावर पकड मजबूत केली. 6 व्या मिनटांत मुंबईला ऑल आऊट केलं. फर्स्ट हाफमध्ये पाटन्याकडे 10 पॉईंट्सची आघाडी होती.

त्यानंतर अनुपकुमार आणि शब्बीर बापूनी मॅचमध्ये चुरस निर्माण केली. पण शेवटच्या क्षणी केलेल्या चुका यू मुम्बाला भोवल्या. सलग दुसर्‍यांदा फायनलला मजल मारूनही पराभवच पदरी पडला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close