भारतीय फॅनचं बांगलादेशच्या फॅनला ‘इट का जवाब पत्थर से’

March 6, 2016 5:34 PM0 commentsViews:

India_Bang3-1-378x25206 मार्च : भारत आणि बांगलादेशमध्ये आज आशिया कपसाठी अंतिम सामना रंगणार आहे. पण, त्याआधी भारतीय फॅन आणि बांगलादेशच्या फॅनमध्ये सोशलमीडियावर युद्ध भडकलंय. कॅप्टन महेंद्रसिंग धोणीच्या त्या बॅनरला उत्तर देत भारतीय फॅनने बांगलाची संपूर्ण टीम अर्धटक्कल करून टाकलीये.

शुक्रवारी बांगलादेशच्या चाहत्यांनी कॅप्टनकुल धोणींचा एक फोटो सोशलमीडियावर अपलोड केला होता. बांगलादेशचा बॉलर तस्कीन अहमदच्या हातात धोणींचं शिर असं हे फोटोशॉपवर कलाकुसर केलेलं चित्र सोशलमीडियावर टाकण्यात आलं होतं. याला उत्तर देत भारतीय फॅन्सनी बांगलादेशची संपूर्ण टीम अर्धटक्कल केलीये.

India_Bang2-1-378x252हे दोन्ही फोटो कुणी टाकले हे स्पष्ट झालं नाहीये. पण, यावर सोशलमीडियावर बरीच चर्चा सुरू आहे. या बॅनर वॉरला खरी सुरुवात झाली होती ती मागील वर्षी वर्ल्डकपच्या वेळी…बांगलादेश विरुद्ध क्वार्टर फायनलच्या सामन्याच्या वेळी रोहित शर्माला आऊट देण्यात आलं नव्हतं. तेव्हापासून बांगला टीम भारतीय टीमवर नाराज आहे.

India_Bang5-378x252 रोहितने शानदार शतक झळकावले होते आणि भारताने बांगलादेशला हरवून सेमीफायनलमध्ये जागा मिळवली होती. तेव्हापासून बांगलादेशचे फॅन आपला राग व्यक्त करण्यासाठी बॅनरबाजी करत आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close