नितेश राणेंना 10 मार्चपर्यंत पोलीस कोठडी

March 6, 2016 6:38 PM0 commentsViews:

सिंधुदुर्ग – 06 मार्च : वाळू वाहतूकदारांच्या आंदोलन प्रकरणी काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांना 10 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीये. त्यांच्यासह 38 जणांनाही कोठडी सुनावण्यात आली आहे.शासकीय कामात अडथळा आणणे, सार्वजनिक मालमत्तेच नुकसान करणे जमाव करून दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण करणे असे आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले आहेत. नितेश राणे यांना पोलीस कोठडी सुनावल्यामुळे नारायण राणे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केलीये.

lathi mar banner213सिंधुदुर्गात वाळू वाहतूकदारांच्या बंदला शनिवारी हिंसक वळण लागलंय. पोलिसांनी केलेल्या लाठीमारात काही आंदोलक जखमीही झाले असून दोन्हीबाजूनी दगडफ़ेकही करण्यात आलीय. सिंधुदुर्गच्या जिल्हाधिका-यांनी जाचक अटी वाळू , खडी , आणि जांभा दगडाची वाहतूक करणार्‍यावर जाचक अटी घातल्याचा निषेध करत शेकडो वाहतूकदारानी आपले ट्रक्स जिल्हाधिकारी कार्यालयात कालपासूनच आणून ठेवले आहे. मात्र, जिल्हाधिकारी या आंदोलकांशी बोलणीही करण्यास तयार होत नसल्याच्या कारणावरून आंदोलक संतप्त झाले. सर्वपक्षीय नेत्यांचाही या आंदोलनाला पाठिंबा मिळाल्यामुळे काँग्रेस आमदार नितेश राणे आंदोलनाच्या जागेवर दाखल होताच आंदोलकांनी जिल्हाधिकारी परिसराचे गेट तोडून आत घुसण्याचा प्रयत्न केला. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार सुरू केला आणि आंदोलन अधिकच भडकत गेलं. यात नितेश राणेंसह आलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. आज त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं असता न्यायालयाने नितेश राणे यांना 10 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावलीये.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close