‘ती’ने भरसमुद्रात 40 किमी पोहण्याचा केला संकल्प !

March 6, 2016 7:07 PM0 commentsViews:

भिवंडी – 06 मार्च : दुर्लक्षाचा निषेध करण्याचे अनेक मार्ग असतात. सकारात्मक पद्धतीनंही अन्यायाचा निषेध करता येतो हे दाखवून दिलंय भिवंडीमधल्या डॉली पाटील हिनं… डॉलीचे वडील देविदास पाटील यांनी 26 जुलै 2005च्या महापुरात 18 पेक्षा जास्त नागरिकांचे प्राण वाचवले होते. मात्र, त्याची कोणीही दखल घेतली नाही. त्याकडे सगळ्यांचं लक्ष वेधण्यासाठी डॉलीनं समुद्रामध्ये 40 किलोमीटर अंतर साडेआठ तासात पूर्ण करून लिम्का बुकमध्ये नाव नोंदवण्याचा संकल्प सोडलाय. त्यासाठी सध्या ती रोज 7 ते 8 तास भर समुद्रामध्ये सराव करतेय.dolly_patil3

26 जुलै 2005 मधील महापुरात 18 जणांपेक्षा जास्त नागरिकांचे प्राण वाचवून सुद्धा वडिलांची कोणीच दखल न घेतल्याने मनामध्ये जिद्द ठेवून समुद्रातील 40 किलोमीटर अंतर साडे आठ तासांत पूर्ण करून लिमका बुकमधील रेकॉड ब्रेक करण्याचा संकल्प केला असून आगरी समाजाचे नाव जगाच्या पाठीवर कोरण्याचा प्रयत्न भिवंडी तालुक्यातील पिंपळघर मधील 10 वर्षांची डॉली देविदास पाटील हिने केला आहे. दररोज सात ते आठ तास ती भर समुद्रामध्येही सराव करत आहे.

डॉली हिने मोठ्या जिद्दीने अनेक प्रशिस्ती पत्रक मिळवून नवी मुंबई येथे जलतरण स्पर्धेत प्रथम क्रमांक, गोवा, पणजी इथं तिसरा आणि महाराष्ट्र राज्य स्तरीय स्पर्धेत दहावा क्रमांक डॉलीने मिळवला आहे. 14 मार्च 2016 रोजी धरमतर जेटी ते गेट वे ऑफ इंडिया हे सागरी 40 किलोमीटर अंतर अवघ्या साडे आठ तासांत पार करून लिमका बुकमधील रेकॉर्ड ब्रेक करणार आहे. मात्र, बैंजो वाजवून लहानपणापासून आपला खर्च वडील करत असून या मोहिमेसाठी मोठा खर्च येणार असल्याने मला मदतीची आवश्कता असल्याचं डॉली पाटील सांगतेय.

धाडसी आणि साहसी अशा सागरी प्रवासाला डॉली पाटील हिस ओपन वॉटर स्विमिंग क्लब ऑफ इंडिया चे डायरेक्टर संतोष पाटील यांनी प्रथमिक चाचण्या घेवून मान्यता दिली आहे. सदर मोहीम ही खर्चिक असून त्यासाठी सुमारे सव्वा लाख रुपये खर्च येणार आहे. त्यामुळे या जिद्दी -धाडसी आणि साहसी चिमुकलीसाठी कोण पुढाकार घेणार असा प्रश्न निर्माण झालाय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close