युसूफची 37 बॉलमध्ये सेंच्युरी

March 13, 2010 3:17 PM0 commentsViews: 1

13 मार्चयुसूफ पठाणने ब्रेबॉर्न स्टेडिअमवर आज फोर आणि सिक्सची बरसात केली. 66 रन्सवर 4 विकेट गेल्याने मॅचवर मुंबई इंडियन्सचे वर्चस्व होते. पण युसूफ पठाण मैदानात उतरल्यानंतर हे चित्रच बदलले. त्याने मुंबई इंडियन्सच्या जवळपास सर्वच बॉलर्सची धुलाई केली. मुर्तझाच्या एकाच ओव्हरमध्ये लागोपाठ 3 सिक्स मारत त्याने आपला इरादा स्पष्ट केला. यानंतर त्याला आवरणे मुंबई इंडियन्सच्या बॉलर्सना शक्य झाले नाही. अवघ्या 37 बॉलमध्ये 100 सेंच्युरी ठोकत युसूफने आयपीएलच्या तिसर्‍या हंगामातील पहिली सेंच्युरी केली. यात त्याने तब्बल 8 सिक्स आणि 9 फोर मारले. आयपीएलमधील ही सर्वात फास्टेस्ट सेंच्युरी ठरली. पण त्याची ही खेळी टीमला विजय मात्र मिळवून देऊ शकली नाही.

close