सापाची नवी प्रजाती ‘खैरई’

March 6, 2016 8:23 PM0 commentsViews:

सह्याद्रीच्या डोंगररांगात खापरखवल्या सापाच्या चौथ्या नव्या दुर्मिळ प्रजातीचा शोध लागला आहे. चार सर्प अभ्यासक शास्त्रज्ञांच्या गटाने या दुर्मिळ प्रजातीचा शोध लावला आहे. मेलेनोफोड्यीम प्रकारच्या सापातल्या एकूण तीन जाती अस्तित्वात आहेत, असं मागील एकेचाळीस वर्ष समजण्यात येत होतं. मात्र, आता मेलेनोफोड्यीम प्रकारच्या सापाच्या चौथ्या नव्या प्रजातीचा शोध लावण्यात आला आहे.

काळसर – निळसर आणि चमकदार दिसणार्‍या या सापाला खैरई असं नाव देण्यात आलं आहे. पुण्यातील भारतीय सर्पविज्ञान संस्थेचे संस्थापक नीलिमकुमार खैरे यांच्या सन्मानार्थ या सापाच्या प्रजातीला खैरई असं नाव देण्यात आल आहे. दक्षिण महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकातील सह्याद्रीच्या डोंगररांगात या सापाचं अस्तित्व आहे. एक ते दीड फूट लांबीचा असणारा साप जमिनीच्या आत राहून गांडूळ खाऊन जगत असतो.

लंडनच्या नेचरल हीस्टरी म्युजियमचे डॉ.डेव्हिड गोव्हर आणि मार्क्स विलिकन्स, बेंगलोरच्या नेचरल सेंटर फॉर बॉयोलोंजीकल सायन्सचे डॉ वरद गिरी, आणि पुण्यातील भारतीय सर्पविज्ञान संस्था आणि बॉम्बे नेचरल सोसायटीचे अशोक क्यापटन या चौघांनी नुकत्याचं प्रसिद्ध केलेल्या झू टेक्सा या वैज्ञानिक नियतकालिकात या संबधीचा शोध निबंध प्रकाशित करण्यात आला आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close