भारत आशियाचा राजा, बांगलादेशला लोळवून जिंकला आशिया कप

March 6, 2016 11:57 PM0 commentsViews:

Asia cup winners finals06 मार्च :शिखर धवनची धडाकेबाज अर्धशतकी खेळी, नावासारखीच नेहमी प्रमाणे ‘विराट’ खेळी आणि विजयाच्या उंबरठ्यावर बेधडक कर्णधार धोणीचा षटकार…क्षणा क्षणाला उत्कंठा वाढवणारा ‘ याची देही याची डोळा’ असा क्रिकेटचा थरार अवघ्या भारताने आज डोळ्यात साठवला. बांगलादेशला त्यांच्याच मायभूमी लोळवून आशियाचा राजा कोण ? हे आज टीम इंडियाने दाखवून दिलं. बांगलादेशवर ८ विकेटने सामना जिंकत भारताने आशिया कपवर सहाव्यांदा नाव कोरलं.

मिरपूरमध्ये भारत आणि बांगलादेशमध्ये महामुकाबला रंगला. पण, सामन्यावर पावसाने शिडकावं केल्यामुळे सामना उशिराने सुरू झाला. पावसामुळे हा सामना १५-१५ ओव्हरचा ठरला. भारताने टॉस जिंकून बांगलादेशला पहिली संधी दिली. बांगलादेशने याचा फायदा घेण्याचा पुरेपुर प्रयत्न केला. सुरुवातील आशिष नेहराने पहिला धक्का देत सोमय्या सरकारला आऊट केलं. त्यानंतर पाचव्या ओव्हरमध्ये तमीन इकबाल आऊट झाला.त्यानंतर आलेल्या शबीर रहमान आणि शकीब हसनने बांगलादेशची इनिंग सांभाळली. मोहम्मदुल्लाने 13 बॉलमध्ये 2 फोर आणि 2 सिक्स लगावत 33 धावा कुटल्या. बांगलादेशने निर्धारित 15 ओव्हरमध्ये 120 धावांचा टप्पा गाठला. भारतासमोर 121 धावाचं लक्ष्य ठेवले. भारताने हे आव्हान २ विकेटच्या नुकसानावर पूर्ण केलं. शिखर धवनने शानदार ६० रन्स काढले तर विराटने साजेशीर खेळी करत ४१ रन्स केले. विजयाची औपचारिकता धोणीने शानदार षटकार लावून पूर्ण केलं या षटकाराबरोबरच भारताने आशिया कप जिंकण्याच ‘षटकार’ लगावला.सहाव्यांदा भारताने आशिया कपवर आपलं नाव कोरत आम्हीच आशियाचे राजे दाखवून दिलं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close