आयएनएस विराटवर आग, एका नौसैनिकाचा मृत्यू

March 7, 2016 9:11 AM0 commentsViews:

INS_Viraat1

07 मार्च : भारतीय नौदलाच्या आयएनएस विराट या युद्धनौकेवर काल (रविवारी) दुपारच्या सुमारास आग लागल्याची दुर्घटना घडली. या आगीत एका नौसैनिकाचा मृत्यू झाला असून अन्य तीनजण जखमी झाले आहेत.

आयएनएस विराट नेहमीप्रमाणे गोव्याच्या दिशेने जात असताना हा प्रकार घडला. यावेळी जहाजावरच्या बॉयलर रूममध्ये वाफेच्या गळती झाल्यामुळे आग लागली. आग लागल्याचे लक्षात येताच जहाजावरील कर्मचार्‍यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आग नियंत्रणात आणली. मात्र, यादरम्यान धुराने गुदमरल्यामुळे चार कर्मचारी गंभीर जखमी झाले. यापैकी अभियंता आशू सिंग यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close